Deputy CM Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

BJP Masterstroke in Solapur: सोलापुरमध्ये पालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपने मोठी खेळी करत अजित पवारांना जोरदार धक्का दिला. भाजपने मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला.

Priya More

Summary -

  • सोलापुरात मतदानापूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली

  • राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार भाजपने फोडला

  • अजित पवार गटाला निवडणुकीआधी सोलापूरात मोठा धक्का बसला

  • प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोलापुरमध्ये महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजपने नवी खेळी खेळली. भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार फोडला. मतदानाला ३ दिवस शिल्लक असतानाच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सोलापुरमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

मतदानाला ३ दिवस शिल्लक असताना सोलापुरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापुरातल्या प्रभाग क्रमांक ९ 'ड' मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत तुषार जक्का यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सोलापुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला.

सोलापूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ड मध्ये भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात लढत होणार होती. पण भाजपने ऐनवेळी खेळी करत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला भाजपत घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स संपला? आठवलेंचं नाव निश्चित, भाजपकडून ३ जागांवर कुणाला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT