सोलापूर : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. ज्यावेळी आमदारांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना चहापाणासाठी वर्षा बंगल्यावर बोलावून घेत, त्यांच्याशी मनमोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा केली होती. तह करा असे म्हणणारे (Gulabrao Patil) गुलाबराव पाटील देखील दुसऱ्याच दिवशी पळून गेल्याचे म्हणत खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निशाणा साधला आहे. (Solapur News Vinayak Raut)
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटायला वेळ देत नसल्याचे म्हणाले. यावर प्रतिक्रीया देताना खासदार राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव यांच्यासह वीस आमदारांना बंगल्यावर बोलावून चर्चा केली. मुख्यमंत्री तुमच्यापैकी कोणाला व्हायचं असेल तर मी खुर्ची खाली करायला तयार आहे; असं सुद्धा उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.
वीस आमदारांनी शपथही घेतली होती
विशेष म्हणजे त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी शिवसेनेपासून दूर जाणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र दुसऱ्या दिवशी गुलाबाराव पाटील आणि बाकीचे आमदार पळून गेले; असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर टिका केलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.