जळगाव : जिल्हा दूध संघाला बदनाम करून संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी हेतपुरस्कर प्रयत्न केला जात आहे. जिल्हा बँकेत (JDCC Bank) काही सापडले नाही; म्हणून दूध संघात हेतपुरस्कार अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे सरकारच्या माध्यमातून तसेच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. (Jalgaon News Eknath Khadse)
जिल्हा दूध संघाच्या कारभारात अध्यक्षा मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) व त्यांचे संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचाऱ्याने शासनाकडे केली होती. त्या तक्रारीवरुन शिंदे सरकारकडून चौकशी समिती देखील नियुक्त केली. दरम्यान चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत उघड झाल्याने संचालक मंडळ विरुद्ध कारवाई करण्याचे शासनाचे उपसचिव नि.भा. मराळे यांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या (Jalgaon) जळगावातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न
यापूर्वीही विरोधकांनी जिल्हा बँकेत खोदून पाहिले. मात्र भ्रष्टाचार आढळून आला नाही. आता जिल्हा दूध संघात एक रुपयांचाही गैरव्यवहार नाही, तुम्हाला शोधायच ते शोधा, जे खोदायच असेल ते खोदा मात्र काहीही सापडणार नाही. तुम्ही तोंडावर पडाल; अशा शब्दात खडसेंनी विरोधकांवर निशाणा साधला. जिल्हा दूध संघावरील प्रशासक मंडळावरही खडसेंनी निशाणा साधला आहे. निव्वळ मला व माझ्या संचालक मंडळाला बदनाम करण्याच्या कटकारस्थाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही खडसेंनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.