NCP Chief Sharad Pawar Sabha Solapur:  Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech: 'अन्याय अन् जुलूम करणारे सरकार खाली खेचा', शेतकरी मेळाव्यातून शरद पवार गरजले; मोदी सरकारवर घणाघात

NCP Chief Sharad Pawar Sabha Solapur: ' राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत आज 'शरद शेतकरी संवाद मेळावा' पार पडत आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुका तसेच मराठा आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. ११ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत आज 'शरद शेतकरी संवाद मेळावा' पार पडत आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुका तसेच मराठा आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले शरद पवार?

"मराठवाड्यातील जनता आमच्या सोबत आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये देखील जनता आमच्या सोबत आहे. बार्शीत आणि पंढरपूर या दोन गावात सायंकाळी सभा होतात आणि त्या चांगल्या होतात. आज भर उन्हात तुम्ही इथे उपस्थित आहात, याचा अर्थ आहे आपण बदलाच्या दिशेने वाहत असण्याच्या दिशेने उभे आहात हे याचे संकेत आहेत. नरेंद्र मोदी यांचा चेहरा राज्यात चालणार नाही," असे शरद पवार म्हणाले.

"आम्ही जात, पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने गुलाल उधळला. कोणत्या आधारावर गुलाल उधळला त्यांना विचारा. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असं सांगितलं होतं. 50 टक्केमध्ये आणून आम्ही आरक्षण देणार आहे, आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करत आहेत. असे शरद पवार म्हणाले.

मोदी सरकारवर टीका!

"लोकसभेला ४०० पार म्हणणाऱ्यांना ३०० ही पार करता आल्या नाहीत. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे आमच्यात कोणी नाही, या सरकारला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आंध्र आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. यांची धोरणे बदलयची असेल तर सरकार बदला. अन्याय आणि जुलम करणारे सरकार खाली खेचा," असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

SCROLL FOR NEXT