मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली काढली आहे. जरांगे यांनी आपल्या रॅलीला पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. आज रविवारी मनोज जरांगे यांची शांतता रॅली पुणे शहरात येणार आहे. दुपारी 12 वाजता सारसबाग येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे.
यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांची शांतता रॅली टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल मार्गावरून जाणार आहे.
पुढे ही रॅली एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक ,जंगली महाराज रस्ता मार्ग डेक्कन जिमखाना भागातील पोहचणार आहे. छत्रपती संभाजी पुतळा येथे रॅलीची सांगता होणार आहे.
त्यामुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
सिंहगड रस्त्यावरून येणारे वाहतूक दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक व व्होल्गा चौक अशी वळविण्यात आली आहे.
एस पी कॉलेज चौकातून पूरम चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.
जेधे चौकाकडे जाणारा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
कुमठेकर रस्त्यावर शनिपार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
मंगला टॉकीज प्रिमिअर गॅरेजकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
शिवाजीनगर न्यायालयाकडून येणारी वाहतूक बंद राहील.
रॅली जंगली महाराज रस्त्यावर आल्यानंतर करण्यात येणारे बदल.
केळकर रस्त्यावरून वाहतूक बंद राहील.
भिडे पूल पुलाची वाडी येथून जंगली महाराज रोडला वाहतूक बंद राहील.
खंडोजीबाबा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
दरम्यान, ही शांतता रॅली जसजशी पुढे जाईल, तसतशी वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.