मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत सोलापूरमधील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूरमध्ये होणारा 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे. 'मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू. आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही.', असे मत माऊली पवार यांनी व्यक्त केले.
२५ सप्टेंबर रोजी सोलापूरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजेरी लावणार आहे. हा कार्यक्रम होण्यापूर्वीच सकल मराठा समाजाने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. अशात आता ओबीसी आंदोलकांनी गणिमी काव्यानं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहे. या दोनही उपोषणला भेट देण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा म्हणजे अंतरवाली फाट्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला. दरम्यान आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील वडीगोद्री येथे थोड्याच वेळात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.