बालाजी सुरवसे
धाराशिव : मागासवर्गीयांच्या एक लाखांवर नोकऱ्या चोरीला गेल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून करण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरणाची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा देखील आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेच्या आधारे भरती झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना ओबीसी, व्ही.जे.एन.टी, एसबीसी व एसटी या जागांवर बेकायदेशीररित्या स्थलांतरित करण्यात आले आहे. या मुळे मागासवर्गीयांच्या लाखो जागा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या संदर्भातील माहिती देण्यास देखील प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे ओबीसी महासंघाचे म्हणणे आहे. यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून धाराशिवचे (Dharashiv News) जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
आंदोलनाचा दिला इशारा
सर्व मागास प्रवर्गातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची रोस्टर तपासणी ही निवड सूचीप्रमाणे करणे गरजेची आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदरील प्रकरणाची चौकशी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील ओबीसी महासंघाकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.