Manoj Jarange Patil hunger strike
Manoj Jarange Patil hunger strikeSaam TV

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार; शिंदे सरकारचं टेन्शन वाढणार, प्रमुख मागण्या काय?

Manoj Jarange Patil hunger strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (१७ सप्टेंबर) पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटी येथे सोमवारी रात्री १२ वाजेपासून त्यांचे उपोषण सुरू होणार आहे.
Published on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (१७ सप्टेंबर) पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटी येथे सोमवारी रात्री १२ वाजेपासून त्यांचे उपोषण सुरू होणार आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते उपोषण करणार असल्याने शिंदे सरकारचं चांगलंच टेन्शन वाढणार आहे.

Manoj Jarange Patil hunger strike
Pune News : ससून रुग्णालयात सर्वात मोठा घोटाळा; कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये, २३ जणांविरोधात गुन्हा

मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी ५ वेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. परंतु अद्याप मराठा समाजाला अद्याप ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेलं नाही.

मागील पाच उपोषणात सरकारने जरांगे यांची मनधरणी करत उपोषण सोडवण्याची विनंती केली होती. सरकारच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी वेळोवेळी उपोषण देखील सोडले. परंतु त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता राज्य सरकारने विशेष अधिवेशन देऊन स्वतंत्र आरक्षण दिलंय.

मात्र हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे सगेसोयरेंची अधिसूचना काढून मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यांची ही मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात घोंगडी बैठका घेतल्यानंतर मनोज जरांगे हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून सलग सहाव्यांदा उपोषण सुरू करणार आहे. त्यांच्या उपोषणामुळे सरकारची कोंडी होणार आहे. कारण, थोड्याच दिवसांत राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार असा इशारा देत जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहे.

दरम्यान, जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी शिंदे सरकारकडून सध्या प्रयत्न सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे देखील जरांगेंच्या भेटीला गेले होते. पण या भेटीत काय चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Manoj Jarange Patil hunger strike
IMD Rain Alert : महाराष्ट्रासह 20 राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा अलर्ट; वाचा वेदर रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com