Manoj Jarange Patil : ''.. तर त्यांचं राजकीय करियर उद्ध्वस्त करेन''; जरांगेंची फडणवीसांना धमकी?
आता राज्य सरकारने आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला वर्षभराचा वेळ दिला. त्यांनी येत्या 2-3 दिवसांत यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला नाही तर मी सर्वांचेच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल. मग तुम्हाला भयंकर पश्चाताप होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी सरकारला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
मनोज जरांगे आता सहाव्यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. बुधवारी जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट देवेंद्र फडणवीस यांना करियर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. ''मला किंवा माझ्या समाजाला राजकारणातही जायचे नाही. ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यांनी या संधीचं सोनं करावं. आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा ते मराठा समाजाचे दोषी ठरतील. देवेंद्र फडणवीस हे या राज्यातील गरिबांवर अन्याय करणारे एकमेव व्यक्ती आहेत. मी मागील 506 दिवसांत एकही राजकीय शब्द उच्चारला नाही. फडणवीस यांनी मला राजकारणाच्या वाटेवर नेऊन सोडू नये. कारण मी एकदा त्या वाटेला गेलो, तर मग मला कुणीही पाडापाडी कशी झाली? राजकीय वाटोळे का झाले? असे प्रश्न विचारू नये,'' असे जरांगे यांनी यावेळी म्हंटले आहे. तसेच मी त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल, असा इशारा देखील जरांगे यांनी फडणवीसांना यावेळी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.