Barshi Fireworks Company Blast Saam TV
महाराष्ट्र

Solapur Blast: बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने परिसर हादरला, पाहा VIDEO

Solapur Barshi Fireworks Company Blast : बार्शी तालुक्यातील घारी गावात फटका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे.

Satish Daud

सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील घारी गावात फटका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता, ५ किलोमीटरचा परिसर कंपनाने हादरला आहे. या स्फोटाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. कानठळ्या बनवणाऱ्या या स्फोटाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी गावात युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा फटाका कारखाना आहे. या कारखान्यात १५ महिला मजूर काम करतात. आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे महिला कामावर आल्यात नाहीत. त्यामुळे कारखाना बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास या कारखान्याला अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. कारखान्यात फटाका बनवण्याचे साहित्य असल्याने क्षणार्धात आगीने संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आगीमुळे कारखान्यात एकापाठोपाठ एक स्फोट झाले.

यातील एक स्फोट इतका भीषण होता, की कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या स्फोटामुळे परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJI Attack : देश जाती, धर्मावर चालतो... संविधान मला मान्य नाही; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे वक्तव्य

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

SCROLL FOR NEXT