Jalgaon Accident : कार- दुचाकीची समोरासमोर धडक; बारा वर्षीय मुलाचा मृत्यू, एकजण जखमी

Jamner News : वाकोद नदीवरील पुल जीर्ण झाल्याने वाहतूक तोंडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

तोंडापूर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावापासून जवळच कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात तोंडापूर- फर्दापुर रस्त्यावर घडला. 

Jalgaon Accident
Latur Crime : चोरी करताना पहिले म्हणून विद्यार्थ्यांचा दगडाने ठेचून खून; अहमदपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

वाकोद नदीवरील पुल जीर्ण झाल्याने वाहतूक तोंडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. तोंडापूर ते फर्दापुर रस्त्यावर तोंडापूर गावाजवळ अजिंठा येथील उस्मान शाह इस्माइल शाह (वय ३४) व नुरा शहा महेमूद शहा (वय १२) हे मामा भाचे फत्तेपूर येथे आजीला भेटण्यासाठी दुचाकीने येत होते. यावेळी तोंडापूरकडून येणाऱ्या शिवना गावाकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार (Accident) धडक दिली. यामुळे दुचाकीवर मागे बसलेला मुलग फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक उस्मान शाह इस्माईल शाह हे जखमी झाले.  

Jalgaon Accident
Onion Price : कांद्याचे दर तेजीत..साठवणूक केलेल्या कांद्याची बाजारात आवक

कार चालकाने जखमीला तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने (Jamner) जामनेर येथे सरकारी रुग्णालयात हालवण्यात आले. धडक जोरदार असल्याने दुचाकीचा चक्काचुर झाला असून कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कारमधील तिघेजण सुरक्षित आहेत. अपघातांची माहिती मिळटाचा पहुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप व कर्मचारी यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशीराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com