Solapur Onion Market News Saamtv
महाराष्ट्र

Onion Rate Down: सोलापुरात १५०० गाडी कांद्याची विक्रमी आवक, दरात मोठी घसरण; बळीराजा चिंतेत

Solapur Onion Market News: निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर बदलत्या वातावरणमुळे आवक वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur APMC Market News:

कांद्याला योग्य भाव देणारी मोठी बाजारपेठ अशी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातूनही शेतकरी आपला माल घेऊन सोलापूरमध्ये येत असतात. मात्र सलग सुट्ट्यांमुळे बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाल्यामुळे दरात घसरण झाली आहे, ज्याचा थेट फटक बळीराजाला बसताना दिसत आहे.

सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पुन्हा एकदा कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. बुधवारी (२४, जानेवारी) बाजार समिती बंद राहिल्याने तसेच उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी असल्याने आवक वाढली असून तब्बल 1500 गाडी कांदा मार्केटमध्ये आला आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर 200 रुपये प्रती क्विंटलने घसरलेत.

मंगळवारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रती किलो इतका भाव होता. आज मात्र कांद्याला 800 ते 1200 रुपये इतका भाव मिळत आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर बदलत्या वातावरणमुळे आवक वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, कांद्याचे दर उतरल्याने वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कांद्याची निर्यातबंदी उठवून हमीभाव द्या अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी संतप्त मागणीही शेतकऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत 'नोटा'ला मतदान करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT