सोलापुरात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सहा जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुण धवलनगर अकलुज येथील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यात शिरला. त्याने घरात १८ जानेवारीला रात्री १ वाजून ४९ मिनिटाला एन्ट्री केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२१ वर्षीय तरुण बंगलाच्या आवारात शिरल्यानंतर त्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, सतिश पालकर, मयूर माने, हिरा खंडागळे यांच्यासहित इतरांनी त्याला चोर समजून पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणाला जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी उकलूज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
२१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अकलूज पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणी सतीश पालकर आणि मयूर माने या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.