Raj Thackeray during his visit to Deputy CM Eknath Shinde’s residence for a closed-door political discussion.
Raj Thackeray during his visit to Deputy CM Eknath Shinde’s residence for a closed-door political discussion.Saam Tv

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

Thackeray–Shinde Closed-Door Talks: राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्याच निवासस्थानी भेट घेतलीय... मात्र ठाकरे- शिंदेंमधील ही भेट नेमकी कशासाठी होती? या भेटीत नेमकं कशावर चर्चा झाली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणावर ही भावना व्यक्त करणारे राज ठाकरे यांनी अवघ्या एका महिन्यातच उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केलीये. या आधी देखिल शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये भेटीगाठी झाल्या परंतू उद्धव ठाकरेंसोबत राजकीय युती केल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे अचानक शिंदेंच्या भेटीला गेल्यानं राजकीय विश्वात खळबळ माजली. गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहिल्या तर या भेटीनंतर अनेक शक्यता व्यक्त होऊ लागल्या. त्या घडामोडी नेमक्या काय आहेत पाहूया

महापालिका निकालानंतर ठाकरे बंधूंची पुरती दाणादाण उडाली. या निकालात उद्धव ठाकरेंना ६५ जागा राखण्यात यश आलं पण राज ठाकरेंना ५० जागा सोडूनही केवळ ६ जागाच मिळाल्या. त्यानंतर निवडणुकांच्या आधी वारंवार भेटणाऱ्या ठाकरे बंधुच्या कौटुंबिक आणि सार्वजनिक भेटीही फार झाल्याचं दिसलं नाही.

त्यामुळे राज ठाकरेंच्या शिंदेंसोबतच्या पाऊण तास झालेल्या चर्चेला विशेष महत्व आलंय. या भेटीत केडीएमसीत पाठिंबा दिल्याबद्दल शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानले असून सभागृहात सेनेला पूर्ण पाठींबा राहील अशी ग्वाही राज ठाकरेंनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. मात्र स्विकृत नगरसेवक आणि पालिकेतील समित्यांमध्ये होणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इतक्या साधक बाधक चर्चेसाठी राज ठाकरे शिंदेंच्या घरी जातील इतकं सोप्पं महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com