Nashik Latest News: नाशिकमध्ये कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं आहे. अवघ्या २० दिवसांत कांद्याचे भाव ५० टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे लासलगाव (Nashik) बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांद्याचा लिलाव बंद पाडला आहे. कांद्याला 20 रुपये किलो दर मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका कांदा उत्पादक संघटनेनं घेतली आहे. (Nashik Latest News)
अवघ्या २० दिवसांत कांद्याचे (Onion) दर ५० टक्क्यांनी घसरले आहेत. १ नोव्हेंबरला सरासरी प्रति क्विंटल २५५१ रुपये असणारा कांद्याचा दर आता सरासरी प्रति क्विंटल १५०० रुपयांवर आला आहे. चाळीत साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत करूनही कवडीमोल दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होणंही मुश्किल झालं. (agricultural sector in nashik News)
कांद्याला कवडीमोल भाव दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी याअगोदरच कांद्याचा लिलाव बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे. प्रचंड मेहनत करूनही कवडीमोल दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.