Bhandara News: शाळा, शिक्षण वाऱ्यावर अन् लहान मुले पुलाच्या कामावर; भंडाऱ्यात बालमजुरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Bhandara child labour News: पूल बांधकाम करण्यासाठी एक कंत्राटदार चक्क बालमजुरांचा उपयोग करत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सासरा येथे उघड आला आहे.
Bhandara child labor News
Bhandara child labor NewsSaamtv
Published On

शुभम देशमुख, भंडारा|ता. २५ जानेवारी २०२४

Bhandara Breaking News:

पूल बांधकाम करण्यासाठी एक कंत्राटदार चक्क बालमजुरांचा उपयोग करत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सासरा येथे उघड आला आहे. एकीकडे प्रजासत्ताक दिनाला काही तास उरले असताना शिक्षण घेण्याच्या वयात चिमुकल्यांना बालमजुरीला जुंपले गेल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांचे पालक म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी स्वतः या गंभीर प्रकाराला अनभिज्ञ असल्याने जिल्हा प्रशासन "राम"भरोसे चालत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16 कोटी रुपये खर्च करून साकोली - लाखनी तालुक्याला जोडणारा, सासरा-मिरेगाव चुलबंद नदीवर पूल बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी वयस्कर मजुरांचा वापर करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र पैसे बचत व्हावी व लाभ अधिक व्हावा यासाठी कंत्रादाराने चक्क बालमजुरांचा वापर सुरू केला आहे. अल्पदरात बालमजूर उपलब्ध होत असल्यामुळे कंत्राटदाराने या बालमजुरांचा वापर सुरू केला आहे.

विशेष म्हणजे हे नियमबाह्य कार्य हा कंत्राटदार कोणालाही न घाबरता दिवसाढवळ्या करीत आहे. दुसरीकडे मुलांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही सुरक्षा किट देण्यात आली नाही. विशेष बाब म्हणजे एक अभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्य अभियंता अशा जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखित हे पुलाचे बांधकाम होत असले तरी या अधिकाऱ्यांना हे बालमजूर दिसले नाही का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara child labor News
Nandurbar Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोर्चे बांधणी; नंदुरबार जिल्ह्यात इच्छुकांची मोठी गर्दी

दरम्यान, चिमुकल्यांचे पालक म्हणून जबाबदारी असलेले भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याही निदर्शनात ही बालमजुरीची बाब लक्षण आणून दिली असता त्यांना आपल्याला हा प्रकार माहित नसल्याचे सांगितले आहे. आपण याची माहिती घेऊन दोशीवर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Bhandara child labor News
Breaking News: शरद पवारांच्या कट्टर समर्थकांसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल; साडेचारशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com