बालमजुरी नष्ट करण्यासाठी एकत्र या; राज्यातील जनतेला कामगार मंत्र्यांचे आवाहन

१४ वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना आढळल्यास, तात्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय अथवा हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळवा.
Child Labor
Child LaborSaam TV
Published On

भूषण शिंदे -

मुंबई : बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असं आवाहन, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिनानिमित्त (Anti-Child Labor Day) राज्यातील जनतेला केले आहे. मुश्रीफ (Hassan Mushrif) म्हणाले, राज्यभरातील १४ वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय अथवा हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळवावी, माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवले जाईल असं त्यांनी सांगितलं.

१४ वर्षाखालील सर्व मुलांना घटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. याकरीता राज्यात १४ वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्व लहान मुलांनी शाळेत शिकून स्वत:चे व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागील भूमिका आहे. असं असतानाही काही समाजकंटक या कोवळ्या जीवांना बेकायदेशीरपणे स्वत:च्या स्वार्थाकरीता कामावर ठेवून त्यांचे शोषण करतात. या कुप्रथेविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे.

हे देखील पाहा -

नागरिकांनी सजगता दाखवून अशा समाजकंटकाची माहिती शासन यंत्रणेस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. अशा समाजकंटकांविरुद्ध खात्रीशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पिळवणूकग्रस्त बालकास पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com