Shirish Valsangkar Suicide note Saam Tv News
महाराष्ट्र

Shirish Valsangkar : न्युरोसर्जन वळसंगकरानी आयुष्य का संपवले? धक्कादायक कारण समोर

Solapur Shirish Valsangkar Death Case: सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली. रूग्णालयातील कर्मचारी मनीषा मुसळे हिच्या धमकीनंतर हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोट व मेलमधून उघड झाल आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Solapur Dr Shirish Valsangkar News Update: न्युरोसर्जन डॉ. वळसंगकर यांना मनीषा माने हिने धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. दोन मुलांना मारून टाकणार आणि पेटवून घेणार अशी धमकी मनीषा माने हिने वलशंकर यांना दिली होती. त्यामुळेच वळसंगकर यांनी आयुष्य संपवले. वळसंगकर यांनी स्वत:वर गोळ्या झाडत आयुष्य संपवले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकऱणी त्यांच्याच रूग्णालयातील मनीषा काळे हिला शनिवारी रात्री बेड्या ठोकण्यात आल्या. रविवारी कोर्टाने मनीषा हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनीषाचा वळसंगकरांना मेल अन्...

वळसंगकर यांच्या आत्महत्याप्रकऱणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यांच्याच रूग्णालयात काम करणाऱ्या मनीषा मुसळे काळे हिने वळसंगकर यांना धमकीचा मेल पाठवला होता. दोन्ही मुलांना मारून टाकेन अन् स्वत:ला पेटवून घेईल, अशी धमकी मनीषाने दिली होती. यामुळे वळसंगकर नैराश्यात गेले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

मनीषाने नेमका मेल काय केला ?

वळसंगकर रूग्णालयात काम करणाऱ्या मनीषाने डॉ. शिरीष वळसंगकर यांना एक मेल पाठवला होता. त्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. मनीषाचे अधिकार कापले, पगार कमी केला. त्यामुळे मनीषा दोन्ही मुलांना मारणार आणि हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवन घेणार. याला सर्वस्वी जबाबदार स्टाफ आणि सर्व वळसंगकर कुटुंबीय राहतील.

सुसाईड नोटमधून खुलासा -

डॉ. वळसंगकर यांनी शुक्रावारी रात्री साडेवाजता बेडरूमध्ये परवाना असलेल्या पिस्तुलने डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या होत्या. न्युरोसर्जन वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न सोलापूरकरांसोबत महाराष्ट्राला पडला होता. शनिवारी वळसंगकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाला वळसंगरकर यांच्या पँटमध्ये एक नोट मिळाली. त्यामध्ये रूग्णालयातील प्रशासनाधिकारी नीषा माने मुसळे यांना जबाबदार धरले होते. सुसाईड नोट पाहिल्यानंतर अश्विन यांनी सदर बाजार पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ?

वळसंगरकर यांनी टोकाचे पाऊल उचलण्याआधी आपल्या पँटमध्ये एक नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी कारण स्पष्ट लिहिले होते. वळसंगकरांनी नोटमध्ये एओ मुसळे असा उल्लेख केलेला आहे. "ज्या माणसाला मी शिकवून प्रशासनाआधिकारी (एओ) केले आहे. चांगला पगार देत आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहेत. त्याचं मला अतिव दु:ख होत आहे. त्यामुळे मी आयुष्य संपवत आहे. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT