Solapur Natepute Payal Randive Sucide Case News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

Solapur Natepute Payal Randive Sucide Case News : सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे विवाहितेने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना. पती व सासरच्यांविरोधात छळाचा गुन्हा दाखल असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू.

Alisha Khedekar

  • नातेपुते येथे विवाहितेची हातावर संदेश लिहून आत्महत्या

  • पती व सासरच्यांवर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप

  • पोलिसांनी पती व सासू-सासऱ्यांना अटक; दिराचा शोध सुरू

  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सासू-सासरा, दीर आणि पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचं नाव पायल रणदिवे असे असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पायल ही माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरी राहत होती. तिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते . यासाठी तिने क्लासही लावला होता, मात्र कुटुंबाने तो क्लास बंद केल्याचे तिला दुःख होते. काल सायंकाळी घरात कोणी नसताना पायल हिने आत्महत्या केली.

पायलच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा असल्याने पायलच्या वडिलांनी पतीसह कुटुंबातील सासू-सासरे आणि दीर याच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्याची तक्रार दिली आहे.

मृत पायलने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहून ठेवले होते. आता पोलिसांनी या प्रकरणात पती शशिकांत सह तिचे सासू-सासरे यांना अटक केली असून दिराचा शोध घेतला जात . आता पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून पायलच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे.

आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट...

आत्महत्येपूर्वी पायलने तिच्या हातावर सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे की, "हसू झालय माझं, माझं पार्लर बंद केलं. जीव होता तो माझा, स्वप्न होतं ग माझं. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते . SORRY" पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पायलने ही न तिच्या आईसाठी आणि माहेरच्या मंडळींसाठी लिहली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT