रमजानसाठी माहेरी आलेल्या महिलेच्या २१ महिन्यांच्या बाळाची हत्या
मुखर्जी नगर परिसरातील पार्कमध्ये घटना घडली
आरोपी मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले
मानसिक तणाव किंवा कौटुंबिक वादाची शक्यता; तपास सुरू
नवी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रमजानच्या काळात माहेरी आलेल्या महिलेच्या २१ महिन्याच्या बाळाची तिच्याच सख्ख्या बहिणीने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. बाळाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हंबरडा फोडला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, सदर घटना नवी दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. दिल्लीतील सीलमपूर येथील सौमीना (बदलेलं नाव) रमजान साजरा करण्यासाठी आपल्या २१ महिन्याच्या बाळा घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. यादरम्यान आज दुपारच्या सुमारास महिलेची बहीण अजरा हिने बाळाला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा केला.
त्यानंतर अजरा बाळाला सोसायटीच्या पार्कात घेऊन गेली. तिथे कोणीही नसल्याचं बघून तिने बाळाची गळा दाबून हत्या केली आणि घटनस्थळी बेशुद्ध झाली. तेथून जाणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने हे भयानक दृश्य पाहिले. त्याने ताबडतोब हस्तक्षेप करून मुलाला महिलेच्या तावडीतून सोडवले. मुलाला जवळच्या न्यूलाइफ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तथापि, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नागरिकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक खोल तपास करत आहेत. आजरा मानसिक तणावाखाली होती का? की जुन्या कौटुंबिक कलहामुळे ही हत्या झाली? याचाही तपास पोलिस करत आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.