Star Air aircraft at Solapur Airport as Solapur–Mumbai flight services resume from August 2, 2026. saam tv
महाराष्ट्र

मुंबई-पुण्यापेक्षा सोलापूर-मुंबई प्रवास सुसाट! 400 किमी प्रवास फक्त एक तासांत

Solapur to Mumbai Flight Service Restart August 2026: २८ जूनपासून बंद असलेली सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहे. स्टार एअरलाईनकडून आठवड्यातील चार दिवस सेवा सुरू राहणार असून वेळापत्रक आणि बुकिंग सुरू झाले आहे.

Omkar Sonawane

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर विमान कंपनीने हा निर्णय घेतला आहे. २८ जून २०२६ पासून स्टार एअरलाईनची सोलापूर-मुंबई विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आली होती.या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी,उद्योजक,रुग्ण तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती. सोलापूरकरांनी ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्टार एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोलापूर ते मुंबई विमानसेवा तात्काळ सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कंपनीला विमानसेवा सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. या प्रयत्नांना यश आले असून स्टार एअरलाईन कंपनीने २ ऑगस्ट पासून सोलापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचे ऑनलाइन बुकिंग काउंटर सुरू करून २ ऑगस्ट पासूनच्या सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, सोलापूर-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर स्टार एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहेत.

आगमन व प्रस्थान-

सोमवार आणि बुधवार -

आगमन सायंकाळी १७:१०(५.१०) वाजता आणि प्रस्थान सायंकाळी १७:४०(५.४०) वाजता.

शुक्रवार आणि रविवार - आगमन दुपारी १३:३०(१.३०) वाजता आणि प्रस्थान दुपारी १४:००(२.००) वाजता.

विमान आगमन आणि प्रस्थान कालावधी हा दिनांक २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहणार असून त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे,अशी माहिती विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT