Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

Solapur Airport News : सोलापूर विमानतळावर विमानाच्या पंखात पतंगाचा नायलॉन मांजा अडकल्याची घटना घडली. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असून ३४ प्रवाशांचे जीव वाचले.

Alisha Khedekar

सोलापूर विमानतळावर विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकला

पायलटच्या सतर्कतेमुळे ३४ प्रवाशांचे प्राण वाचले

विमान सुरक्षित लँडिंग

अल्पवयीन मुलं पतंग उडवत असताना घडली घटना

नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानच लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणाऱ्या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगलाच समज दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलं विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरले. विमानतळ परिसरात मोकळ्या आभाळात ते पतंग उडवू लागले. दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहुन सोलापूरला एक विमान दाखल झाले. यामध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर विमानतळाच्या रनवेवर हे विमान लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकला.

ही बाब पायलटच्या लक्षात येताच पायलट सतर्क झाले. त्यांनी सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केले. त्यामुळे ३४ प्रवाशांवरचे मोठे संकट दूर झाले. याप्रकरणी शोध घेतला असता विमानतळ परिसरात काही अल्पवयीन मुलं पतंग उडवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या मुलांचा शोध घेत मुलांना आणि त्यांच्या पालकांना चांगली समज दिली.

शिवाय विमानतळ परिसरात गैर पद्धतीने नायलॉन मांजा विकणाऱ्या बिलाल इब्राहिम शेख या दुकानदारा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान नायलॉन मांजा विकण्यावर बंदी असतानाही अद्यापही त्याची विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT