Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ४ सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती; प्रेरणादायी प्रवास वाचा

Madha 4 Deputy Collector Success Story: माढा तालुक्यातील चार सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांची पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाचे सर्वांनाच कौतुक आहे.

Siddhi Hande

माढ्यातील चार सुपुत्रांची अभिमानास्पद कामगिरी

चार सुपुत्रांची जिल्हाधिकारी पदावर वर्णी

किरण सुरवसे, गणेश शिंदे, गणेश गोरे आणि प्रदीप साबळे

अक्षय गुंड, साम टीव्ही प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. दरम्यान, माढ्यातील चार सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आबे. माढा तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

किरण सुरवसे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती

एकाचवेळी या तालुक्यातील चार सुपुत्रांना पदोन्नती मिळत उपजिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये वेताळवाडीचे सुपुत्र तथा हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले किरण सुरवसे यांची पदोन्नती सोलापूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी झाली आहे. ते २००४ साली नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात रूजू झाले होते. त्यांनी आतापर्यंत रायगड, ठाणे व पुणे जिल्ह्यात सेवा बजावली आहे.

प्रदीप साबळे यांची भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून निवड

माढ्यातील दारफळ सिना येथील सुपूत्र प्रदीप उबाळे यांचीही पदोन्नती झाली आहे. प्रदीप उबाळे हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांची नागपूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१४ साली राज्यसेवेतून तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झाले होते.

गणेश शिंदे यांची प्रांधिकारी म्हणून निवड

बारामती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले निमगाव (टे) चे सुपुत्र गणेश शिंदे यांची पदोन्नती धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्रांतधिकारी म्हणून झाली आहे. त्यांनी २००७ साली राज्यसेवेत नायब तहसीलदार म्हणून प्रवेश केला होता आणि विदर्भ, सांगली, बारामती या ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली आहे.

गणेश गोरे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड

लऊळ गावाचे सुपुत्र तथा गगनबावडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले बट्टू उर्फ गणेश गोरे यांची पालघर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २००३ साली नायब तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झाले होते.

एकाच तालुक्यातील चार अधिकाऱ्यांना एकाचवेळी उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळणे ही माढा तालुक्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: फुगा फुगवताना फुटला, श्वसननलिकेत तुकडा अडकला; १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

Maharashtra Live News Update: बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची धरपकड

Suraj Chavan Video : सासुरवाडीत सूरज चव्हाणचा स्वॅग; हटके स्टाइलमध्ये घेतलं बायकोचं नाव, उखाणा होतोय व्हायरल

Original vs Fake Charger: खरा अन् बनावट चार्जर कसा ओळखाल? वाचा सोपी ट्रिक्स

School Holiday: मोठी बातमी! ८ ते १४ डिसेंबर; राज्यातील शाळांना आठवडाभर सुट्टी; कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT