Solapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime: तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले, मध्यरात्री आई अन् दोन मुलांची तलवारीने वार करत हत्या

Solapur Crime News: सोलापूरमध्ये महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली. दिरानेच संपत्तीच्या वादातून तिघांवर तलवारीने वार करत संपवलं. या तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले आहे.

Priya More

Summary -

  • सोलापूरच्या बोरामणीत तिहेरी हत्याकांड

  • आई आणि दोन मुलांची तलवारीने वार करत हत्या

  • संपत्तीच्या वादातून दिराने केलं भयंकर कृत्य

  • पोलिसांकडून तपास सुरू

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. मध्यरात्री आई आणि दोन मुलांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूरच्या बोरामणी परिसरात घडली. महिलेच्या दिरानेच हे भयंकर कृत्य केलं. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. संपत्तीच्या वादातून दिराने हे भयंकर कृत्य केले. त्याने भावाच्या बायको म्हणजे वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतला. मध्यरात्री तिघांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत. महिलेच्या नवऱ्याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.

गायत्री आपल्या दोन मुलांसह बोरामणी परिसरात राहत होती. नवऱ्याच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसाबसा त्या संसार करत होत्या. गायत्री यांचा दिर पप्पू शेजारीच राहत होता. मध्यरात्री तो स्वतःच्या घरातून वहिनीच्या घरात घुसला. त्याच्या हातामध्ये तलवार होती. गायत्री आणि त्यांचा दिर पप्पू यांच्या घरांना एकाच गच्चीवर जाण्याचा मार्ग आहे. गायत्री आणि त्यांची दोन्ही मुलं गच्चीवर झोपले होते. यावेळी संपत्तीच्या वादातून जोरदार हाणामारी सुरू झाली.

त्यानंतर आरोपीने हतातल्या तलवारीने आधी गायत्री यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची दोन्ही मुलं त्यांना वाचवण्यासाठी मध्य पडले. तर आरोपीने त्यांच्यावर देखील तलवारीने सपासप वार केले. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आणि संपूर्ण घर सील केले. आई आणि मुलांच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT