solapur news Saam tv
महाराष्ट्र

लव्ह मॅरेजचा भयानक शेवट! नवऱ्याने 50 वार करून बायकोला भर रस्त्यात निर्घृणपणे संपवलं, सोलापूर हादरलं

solapur barshi crime news : सोलापूरच्या बार्शीमध्ये लव्ह मॅरेजचा भयानक शेवट झाला आहे. नवऱ्याने 50 वार करून बायकोला भर रस्त्यात निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सोलापूरच्या बार्शीत भररस्त्यात पत्नीची निर्घृण हत्या

नवऱ्याने बायकोवर चाकूचे तब्बल ५० वार केले

नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून केलाय

सोलापूरच्या बार्शी शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शीच्या गाडेगाव रोड परिसरात घडलेल्या थरारक घटनेने शहर हादरलं आहे. ऋषिकेश पाटील नावाच्या तरुणाने बायको धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. नवऱ्याकडून चारित्र्याच्या संशयातून बायकोची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटील हा खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेत कार्यरत होता. तर त्याची बायको धनश्री पाटील ही बँकेत नोकरी करत होती. ऋषिकेश पाटीलचा बायको धनश्रीच्या चारित्र्यावर संशय होता. ऋषिकेश हा बार्शी-परंडा रोडवरील एका बीअर बारसमोर होता. त्याचवेळी त्याची बायको धनश्री दुचाकीवरून जात होती. त्यावेळी नवऱ्याने बायको धनश्रीची वाट अडवून चाकूने सपासप वार केले. त्याने तिच्यावर जवळपास ५० वार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

धनश्रीवर धारदार शस्त्राने वार करताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. ऋषिकेशने धनश्रीला वाचवण्यास येणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं.

ऋषिकेशने धनश्रीची हत्या केल्यानंतर स्वत: बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल पोहोचले. पोलिसांच्या फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणाचा तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत. तत्पूर्वी, ऋषिकेश आणि धनश्री या दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. मात्र, वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या संशयातून ही धक्कादायक घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT