Solapur aspiring corporator murder case Saam TV
महाराष्ट्र

Solapur : भावी नगरसेवकाची निर्घृण हत्या, उशीनं तोंड दाबून उमेदवाराला संपवलं, ५० तोळं सोनं गायब

Solapur crime news : सोलापूरमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी भावी नगरसेवक अय्युब सय्यद यांची निर्घृण हत्या करण्यात आली. उशीने गळा दाबून खून करून ५० तोळे सोने लंपास केल्याचा संशय आहे.

Namdeo Kumbhar

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Solapur aspiring corporator murder case : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला असतानाच सोलापूरमध्ये एका उमेदवाराचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या भावी नगरसेवकाची(Solapur municipal election crime news) हत्या झाली. तृतीयपंथी अय्युब सय्यद (वय ५० रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) यांचा उशीने गळा दाबून खून (Pillow murder and gold robbery Solapur) करण्यात आला. त्यानंतर ५० तोळं सोने लंपास केलेय. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की सोन्यासाठी झाली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. महानगरपालिकेसाठी तयारी करणाऱ्या अय्युब सय्यद या भावी नगरसेवकाचा खूनाच्या घटनेनं (Solapur Crime News) सोलापुरात खळबळ उडाली आहे.

सोलापुरातल्या लष्कर परिसरात अय्युब सय्यद यांचा खून झाला. संशयित आरोपी सिसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १६ मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. तसे विडिओ फोटो त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. त्यांच्या पोस्ट लाखोंच्या संख्येने पाहिल्याचे दिसतेय. पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीनुसार, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करत होते. तेच तीन इसम रात्री 2 च्या सुमारास परत जाताना दिसत आहेत. त्यांनी ही हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

शनिवारी दुपारी अय्युब सय्यद यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्या ३ अज्ञात लोकांनीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी cctv मध्ये दिसणाऱ्या तिघां संशयित आरोपीचा शोध न सुरु केला आहे. अय्युब सय्यद यांच्याकडील ५० तोळेही गायब आहे. अय्युब यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास देखील सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने केला जातोय.

अय्युब सय्यद यांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. उत्तर सदर बझार येथील तृतीयपंथी अय्युब हुसेन सय्यद यांचा खून का केला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अय्युब सय्यद हे शुक्रवारी रात्री झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले होते. त्यानंतर ते दुपार झाली तरी खाली आलेच नाहीत. त्यामुळे त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेनं घरात जाऊन पाहिले. त्यावेळी ते बेडवर पडलेले दिसले, त्यांच्या तोंडावर उशी होती. त्या महिलेने तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी पोस्टमार्टम केला आहे. घरातील ५० तोळे सोनेही गायब असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेय. सोलापूर पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

Pune : पुण्यातील नामांकित पबमध्ये पोलिसांची धाड! नववर्षाच्या बेकायदा पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५२ जणांवर गुन्हा दाखल

गौतम भाई आणि प्रीती भाभी.., सुप्रिया सुळेंचे अदानी कुटुंबासाठी गौरवोद्गार|VIDEO

Marathi Actress Arrested: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक; कोट्यवधींची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

Actor Apologised: महिला आयोगासमोर प्रसिद्ध अभिनेत्याने मागितली माफी; महिलांच्या कपड्यांवर केली होती 'ही' अश्लील कमेंट

SCROLL FOR NEXT