Solapur Accident Saam tv
महाराष्ट्र

Solapur Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारवर कंटेनर पलटी, एकाचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

Solapur News : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळील घटना असून तुळजापूरवरून अक्कलकोटच्या दिशेने भाविक देवदर्शनासाठी मार्गस्थ झाले असताना भीषण अपघात झाला आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सुट्या असल्याने देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. महामार्गावर समोरून येणार कंटेनर कारवर पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या अक्कलकोट- तुळजापूर महामार्गावर दुपारच्या सुमारास कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळील घटना असून तुळजापूरवरून अक्कलकोटच्या दिशेने भाविक देवदर्शनासाठी मार्गस्थ झाले असताना भीषण अपघात झाला आहे. अपघात घडल्यानंतर गावातील नागरिकांनी धाव घेत कारमधील सर्वाना बाहेर काढले. 

दोन गाड्यांना धडक देत कंटेनरवर कार पलटी 

अक्कलकोट- तुळजापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. चपळगाव येथे आल्यानंतर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरचा तोल गेल्यामुळे दोन चारचाकी वाहनांना धडक दिली. यानंतर एका कारवर हा कंटेनर पलटी झाला. यामुळे कार चकणाचूर झाली असून कारमधील एक जण ठार झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी असल्याची माहिती आहे. सदर चार चाकी वाहन पुणे आणि लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली असून अपघातात जखमींना उपचारासाठी सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पेट्रोल पंपावर थांबलेल्या गाडीला आग
सोलापुरात पेट्रोल पंपावर थांबलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील जुने सोलापुरातील एका खाजगी पेट्रोल पंपावर घटना घडली असून यात गाडी संपूर्ण जळून खाक झाली असून मात्र कोणतीही अग्निशामक दलाची यंत्रणा घटनास्थळी दाखल नाही. मात्र गाडीला भीषण आग ही पेट्रोल पंप परिसरातच असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT