solapur saam tv
महाराष्ट्र

Breaking : भरधाव वाहनाने पायी चालणारे सहा वारकरी चिरडले; सोलापूरमधील धक्कादायक घटना

सोलापूरमधून धक्कायक वृत्त समोर आलं आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे.

भारत नागणे

Solapur News : सोलापूरमधून धक्कायक वृत्त समोर आलं आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे. हा अपघात सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जुनोनी गावा जवळ घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये मोठा अपघात घडला आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे. सदर अपघात हा सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ घडला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला आणि दोन पुरूषाचा सामावेश आहे. सदर अपघात सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताची खबर मिळताच सांगोला पोलीस हे घटनास्थळी पोचले आहेत.

या अपघातात शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT