जितेश कोळी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पो चालकाने तीन ते चार वाहनांना धडक दिली. आज सोमवारी ही अपघाताची घटना घडली असून कोणतीही जीवितहानी झाली नाहीय. परशुराम घाटातून येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाला. जवळपास तीन ते चार वाहनांना या टेम्पोची धडक बसल्याने विचित्र अपघात झाला. परिणामी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (Drunk tempo driver hits vehicles at Mumbai goa highway)
मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतात. पंरतु, या महामार्गावरून अवजड वाहने घेऊन जाणारे चालक सर्रासपणे दारू पिऊन प्रवास करत असल्याचं आज पुन्हा एकदा समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका टेम्पो चालकाने परशुराम घाटात तीन-चार वाहनांना धडक दिली. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातामुळं महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे संबंधित ट्रक चालकाविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.