India vs Pakistan: भारत-पाकिस्तान टेस्ट मॅचसाठी जोरदार तयारी, 'या' ठिकाणी होणार महामुकाबला?

भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ट्राय सीरीजही होणार?
Rohit sharma and babar azam
Rohit sharma and babar azamsaam tv

मुंबई : टी20 वर्ल्डकपमध्ये मेलबर्नच्या मैदानात तब्बल 90 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारत-पाकिस्तानचा रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. संपूर्ण क्रिडा विश्वाला प्रतीक्षा लागलेल्या भारत-पाक सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. मात्र, दिर्घकाळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय सीरीज खेळवली गेली नाहीय. क्रिडा प्रेमींना दोन्ही संघामध्ये होणाऱ्या लढतीची नेहमीच उत्सुकता लागलेली असते.

त्यामुळे आता लवकरच भारत-पाकिस्तान (india vs Pakistan) यांच्यात टेस्ट मॅच होणार आहे. याबाबत चर्चासत्र सुरु असून ऑस्ट्रेलियात हा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ट्राय सीरीजही होण्याची शक्यता आहे. (india vs pakistan test match series latest news update)

Rohit sharma and babar azam
T20 World Cup: टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याआधी आली मोठी अपडेट, विजयाच्या आशांवर 'पाणी'

ऑस्ट्रेलियाच्या रेडियो स्टेशन 116SEN नं दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मॅच संदर्भात चर्चा होत आहे. भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक ट्राय सीरीज होण्याची चर्चा आहे. भारत-पाकिस्तान मध्ये शेवटची टेस्ट सीरीज 2007 मध्ये भारतात झाली होती. त्यावेळी भारतानं तीन सामन्यांची मालिका 1-0 ने खिशात घातली होती.

Rohit sharma and babar azam
Virat Kohli Video : विराट कोहलीच्या खोलीतील व्हिडिओ लीक; सोशल मीडियावर व्हायरल

70 वर्षात फक्त 59 टेस्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली टेस्ट 1952 मध्ये झाली होती. मधल्या 70 वर्षांच्या कालावधीत दोघांमध्ये फक्त 59 टेस्ट खेळवले गेले आहेत. भारतानं 9 टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 12 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. 38 सामने बरोबरीत झाले. वनडेबाबत बोलायचं झालं तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 132 सामने झाले आहेत. भारताने 55 तर पाकिस्तानने 73 सामन्यांमध्ये विजय संपादन केलं. चार सामन्यांचा निकाल लागलेला नाहीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com