T20 World Cup: टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याआधी आली मोठी अपडेट, विजयाच्या आशांवर 'पाणी'

भारत - बांगलादेश यांच्यात २ नोव्हेंबरला लढत होतेय. दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा असतानाच आली मोठी बातमी
T20 World Cup India vs Bangladesh Adelaide / File
T20 World Cup India vs Bangladesh Adelaide / FileSaam TV

T20 World Cup, Team India : टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताचा पुढचा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना अॅडलेडमध्ये होईल. या सामन्यासाठी टीम इंडियातील खेळाडू पर्थहून रवाना झाले आहेत.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी २ नोव्हेंबरला होणारा हा सामना महत्वाचा आहे. मात्र, या महत्वाच्या लढतीत टीम इंडियाला विजय मिळणे कठीण आहे. बांगलादेशसोबतही असं घडू शकतं. आता हे कसं होणार असा प्रश्न पडला असेल. पण दोन्ही संघांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील पुढचा सामना २ नोव्हेंबरला अॅडलेडच्या मैदानात होणार आहे. मात्र, या दिवशी पाऊस आपली खेळी खेळणार आहे, अशी चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अॅडलेडमध्ये या दिवशी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्यावेळीच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाऊस पडला तर हा सामना रद्द होईल का? तो रद्द झाला तर नेमके काय होईल, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. (Cricket News)

अॅडलेडमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्या दिवशी शहरात वातावरण ढगाळ राहील. २०-३० किलोमीटर प्रतीतास वाऱ्याचा वेग राहील. संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. २ नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये पावसाची शक्यता ६० ते ७० टक्के आहे.

या हवामानाचा थेट परिणाम भारत - बांगलादेश सामन्यावर होऊ शकतो. पावसामुळे सामना रद्द झाला तर, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. बांगलादेशविरुद्धचा हा सामना रद्द होणे टीम इंडियासाठी चांगले संकेत नसतील. कारण यामुळे टीम इंडियाचे सेमिफायनलचे समीकरण बिघडेल. हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी (Team India) महत्वाचे आहे.

गुणतालिकेत भारत-बांगलादेश कुठे?

भारत आणि बांगलादेश गुणतालिकेत कुठे आहेत हे जाणून घेऊयात. दोन्ही संघ ग्रुप २ मध्ये आहेत. भारत गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका पाच गुणांसह पहिल्या स्थानी आहे. बांगलादेशचेही चार गुण आहेत. ते तिसऱ्या स्थानी आहेत. रनरेटमध्ये भारत आघाडीवर आहे. मात्र, २ नोव्हेंबरला होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघांना विजय मिळवणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com