Safran Project : नागपूरचा सॅफ्रन प्रोजेक्ट हैदराबादला जाणार, विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर बरसले

सॅफ्रन प्रोजेक्ट हैदराबादला गेल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आणि सरकारला धारेवर धरलं आहे.
Safran Project
Safran Project Saam TV

मुंबई : वेंदाता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअर बस प्रोजेक्ट नंतर आता सॅफ्रन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विमान आणि रॉकेट बनवणारी फ्रेंच कंपनी SAFRAN प्रथम नागपुरातील मिहानमध्ये येण्यास इच्छुक होती. यामध्ये 1185 कोटींची गुंतवणूक होणार आहे. मात्र हा प्रोजेक्ट हैदराबादला गेल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आणि सरकारला धारेवर धरलं आहे.

याबाबत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मोठे प्रकल्प राज्याबाहेर जातात, ही गंभीर बाब आहे. पुढच्या वेळेला यापेक्षा मोठा प्रकल्प आणू, असं सांगून लॉलिपॉप दिलं जातंय. तेही प्रकल्प आणा आणि हेही प्रकल्प टिकवा. आम्ही प्रकल्प आणले सांगत त्यांनी यादी दिली. परंतु ते प्रकल्प कुठल्या काळामध्ये आले, हे पाहिलं पाहिजे. जुन्याच प्रकल्पांची यादी देणं हास्यास्पद आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. (Latest News )

Safran Project
Safran Project: चाललंय काय? आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर? सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

महाराष्ट्रासाठी हा दुर्दैवी कालखंड आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. एकामागून एक अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय हे कळत नाही, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेसच्या सतेज पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला. राज्यातील गुंतवणुक कमी करणे हा एकच अजेंडा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्राची पिछेहाट करण्याचे षडयंत्र आहे. राज्यात प्रकल्प कसे राहतील यासाठी काम केले पाहिजे. लाखो तरुणांचा रोजगार गेला. यावर आरोप करण्यापेक्षा नव्याने प्रकल्प येण्यासाठी काय करता येईल हे पाहिले पाहिजे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं.

Safran Project
Bharat Jodo Yatra: भारताचे तुकडे होऊ देणार नाही; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी लहानग्यांसोबत मनसोक्त धावले, पाहा Video

मनसेचे सरचिटणीन मनोज चव्हाण यांनी याचं खापर सरकारी अधिकाऱ्यांवर फोडलं आहे. सॅफ्रन प्रकल्प का बाहेर गेला याची चौकशी करावी. जागेशी संबंधित विलंबामुळे आणि प्रशासन दिरंगाईमुळे हा प्रकल्प गेला असेल तर याला फक्त सनदी अधिकारी जबाबदार आहेत का याची चौकशी होणे गरजेचे आहे. नेमके शुक्राचार्य कोण आहेत या बाबतीत चौकशी करावी. याआधी सुद्धा महाराष्ट्रात सनदी अधिकाऱ्यांमुळे असाच BMW प्रकल्प राज्याबाहेर गेला, असं चव्हाण यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com