Nanded Crime News, Bharat Poptani, Special Investigation Team saam tv
महाराष्ट्र

Harvinder Singh Rinda News : संजय बियाणी हत्याकांड तपासाची गती वाढणार, दहशतवादी रिंदाचा विश्वासू मॅक्स जेरबंद

बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली होती.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा (harvinder singh rinda) याचा जिवलग मित्र आणि राईट हँड समजल्या जाणाऱ्या भरत पोपटाणी (bharat poptani arrested) उर्फ मॅक्सला विशेष तपास पथकाने (Special Investigation Team) बेड्या ठोकल्या आहेत. खंडणीसाठी रिंदाने व्यापाऱ्यांना फोन केल्यानंतर भरत पोपटाणी हाच मध्यस्थी करून खंडणीची रक्कम रिंदाकडे पाठवित होता. (Maharashtra News)

सातत्याने तो रिंदाच्या संपर्कातही होता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याच्या मागावर होत्या. त्यातच विशेष तपास पथकाने त्याला शिताफीने अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याने खंडणीसाठी मागील वर्षी 5 एप्रिलला बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या केली होती. त्यापूर्वीही रिंदाने जिवे मारण्याची धमकी देवून व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली होती. बियाणी (Sanjay Biyani Nanded) यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली होती.

या पथकाने बियाणी हत्येतील 16 जणांच्या मुसक्या आवळल्या. तर दोन शार्पशुटर हे एनआयएच्या ताब्यात आहेत. परंतु त्यानंतरही रिंदाच्या नावाने व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार सुरूच होते. त्यातच काही दिवसापूर्वी पोलिसांनी सापळा रचून रिंदाच्या नावे खंडणी मागणाऱ्यांना बेड्या ठोकल्या.

त्यानंतर आता रिंदाचा जिवलग मित्र असलेल्या भरत पोपटाणी उर्फ मॅक्सला नांदेडातून (nanded) पकडण्यात आले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यामुळे रिंदाने नांदेडात किती जणांकडून आणि किती रकमेची खंडणी वसूल केली यासह अनेक खुलासे होणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT