Parbhani Crime News: पहिलीच्या प्रवेशासाठी लाच घेतली, एसीबीची लिपिकासह मुख्याध्यापकावर कारवाई

या घटनेमुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.
Parbhani, Parbhani Crime News
Parbhani, Parbhani Crime Newssaam tv
Published On

Parbhani News : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील शिक्षण विभागच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचे रकाने वर्तमानपत्रात दर रोज भरून येण्याची श्रंखला एका बाजूला थांबत नसताना आता जिल्ह्यातील शासनमान्य शाळांमध्ये प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशन घेऊन पालकांची पिळवणूक होत असल्याचे अधोरेखित होत आहे. (Maharashtra News)

Parbhani, Parbhani Crime News
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेनंतर अजित पवार भावविवश, आतातरी...

शहरातील बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळा, नानलपेठ भोई गल्ली येथे पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी 7500 रुपयांची लाचेची मागणी करून 4000 रुपये लाच स्वीकारताना येथील शाळेचा कनिष्ठ लिपिक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद (वय 54) तसेच मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे (वय 57) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा लावून अटक केली आहे.

Parbhani, Parbhani Crime News
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

यातील तक्रारदार यांच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी यातील दोन्ही शिक्षक, शिक्षतर कर्मचारी यांनी 7500 रुपयांची लाच मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली होती. 28 जून रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक व लिपिक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी तडजोडीअंती 5500 रुपये पंचासमक्ष लाचमागणी केली. त्यापैकी 4000 रुपये 3 जुलैला मुख्याध्यापकांनी शाळेचे कनिष्ठ लिपिक यांच्याकडे देण्यास सांगितले. उर्वरित 1500 रुपये दीड ते दोन महिन्यांनंतर आणून देण्यास सांगितले.

Parbhani, Parbhani Crime News
MNS Andolan: तात्पूरता नकाे कायमस्वरुपी रस्ता द्या; मनसे कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरुन छेडलं आंदाेलन

3 जुलैला करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचे कडून 4000 लाचेची (bribe) रक्कम पंचासमक्ष लिपिकाने स्विकारली. लाचेच्या रकमेसह कनिष्ठ लिपिक यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यालाही एसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नानलपेठ पाेलिस ठाणे येथे करण्यात आली.

Parbhani, Parbhani Crime News
Satara News : मुख्यमंत्री साता-यात, जिल्हाधिका-यांसह एसपींकडून घेतली महत्त्वपूर्ण माहिती; दिले हे निर्देश

या प्रकरणी डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, परभणी सापळा तपास अधिकारी बसवेश्वर जकीकोरे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो, परभणी.सापळा कारवाई पथक म्हणून पोहेकॉ मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार,पोकॉ अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल यांनी काम पाहिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com