MNS Andolan: तात्पूरता नकाे कायमस्वरुपी रस्ता द्या; मनसे कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरुन छेडलं आंदाेलन
- फय्याज शेख
Shahapur News : समृद्धी महामार्गावरील रस्त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर गावकऱ्यांनी पाण्यात बसून आंदोलन छेडले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले. दरम्यान प्रशासनाने तत्परता दाखवत रस्ता केला परंतु कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. (Maharashtra News)
शहापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी मार्गाचा काम पुर्ण तत्वावर आले आहे. हा महामार्ग बनवतांना अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे. या खोदकामामुळे रस्त्यातच नदी, नाले तलावाचे स्वरूप आले होते. याची कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली गेली नाही.
काही ठिकाणी रहदारीचा रस्ता खोदल्याने उन्हाळ्यात कसे बसे लोक जात होती. मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे रहदारीचा रस्ता बंद झाला. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना एका पोकलेनच्या सहाय्याने एका बाजूने दुसऱ्या बाजूला घेऊन जात होते. ही बातमी साम टिव्हीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती.
प्रशासनाने त्याची दखल घेत तातडीने पर्यायी रस्ता बनवला. मात्र हा रस्ता देखील वाहून जाईल अशी भिती व्यक्त करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) माध्यमातून गावकऱ्यांनी आंदोलन केले आहे. या आंदाेलनात विद्यार्थी देखील माेठ्या संख्येने सहभागी झालेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.