- सुशिल थाेरात
Nilesh Lanke News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते आणि कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!" असे ट्विट आमदार निलेश लंके यांनी केली आहे. (Maharashtra News)
राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar's Rebellion) यांनी दुसरा महाभूकंप केलाय. अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी नगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देखील त्यांच्या सोबत होते.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान या सर्व आमदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक निलेश लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पाेस्टची चर्चा हाेऊ लागली आहे.
लंके लिहितात "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब (Sharad Pawar) , अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) हे आमचे नेते आणि कुटुंब प्रमुख आहेत.ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे.
सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!"
सगळ ठरवून ओके चाललेलं दिसतं नेते एक दोन दिवसात तुम्ही आमदार असुन सांगताय म्हणजे गणिमी कावा उद्धव ठाकरे साहेबांचा केला असावा असे राम गाडेकर पाटील यांनी लंके यांच्या पाेस्टवर कमेंट केली आहे.
त्यावर कोणत्याही गोष्टीला आधार असेल तरच राजकारणात उलथापालथ होते . काल शिवसेनेवर तर आज राष्ट्रवादीवर घाव टाकला गेला , शिवसेना ज्या जोमाने उभी राहतीये तिच्या कैकपटीने राष्ट्रवादी उभी राहिल कारण संयमासोबतच,ऊर्जा अजुनही जागेवर न बसता जनतेच्या दरबारात उतरली आहे असे हेमंत ढमाले देशमुख लिहितात.
ते म्हणतात राजकीय स्वार्थासाठी पवार साहेब काहीही करु शकतात म्हणणार्यांना 2019 मधे शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती . ती अत्यंत चाणाक्ष व धीरोदात्तपणाने त्यांनी लीलया पेलली देखील.
परंतु आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी केंद्रातील सत्तेचा वापर करुन पक्ष फोडाफोडी करणारेंना धडा शिकविण्यासाठी शरद पवार साहेबच पर्याय आहेत हे ही लक्षात घ्या .
महाविकास आघाडी एक आहे हि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या .
जनता तुमच्या सोबत आहे , तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा असे संग्राम गायकवाड यांनी नमूद केले. जर भाजपा सोबत गेले तर निवडून येत नाही तुम्ही मतदार संघात लक्षात असू द्या असे सूरज धामी यांनी म्हटलं
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.