Udayanraje Bhosale News : साता-यातील दाेन्ही राजांसाेबत विकासकामांबाबत चर्चा झाली. सिंचनाचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत. काही निवेदनं दाेघांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिली. साता-यात जे काही झालं ते जनतेच्या प्रश्न मांडताना झाला. यामध्ये काही गंभीर घडतय असे काही नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या राड्यावर दिली. ते आज कराड येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)
दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या कोअर कमिटीची (Satara Lok Sabha Constituency BJP Core Committe Meeting) आज (गुरुवार) कराड येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासमेवत बैठक झाली. या बैठकीचा तपशिल समजू शकला नाही परंतु फडणवीस यांनी कमिटीकडून काही महत्वाच्या बाबी समजून घेतल्याचे समजते.
या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भाेसले यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कालच्या वादाबाबत काय बाेलणी झाली का ? या प्रश्नावर उदयनराजेंनी वाद असा काही नाही असं म्हटलं.
उदयनराजेंचे माैन
सातारा लाेकसभा निवडणुक लढविण्यास तुम्ही इच्छुक आहात ? या प्रश्नावर खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी माैन बाळगले. त्यानंतर ते नियाेजीत कार्यक्रमास निघून गेले. दरम्यान आजच्या भाजपच्या काेअर कमिटीच्या बैठकीचा सविस्तर तपशिल आगामी काळात समजेलच परंतु भाजप उदयनराजेंबराेबर आणखी एका उमेदवाराचा शाेध सातारा लाेकसभा मतदारसंघासाठी घेत असल्याची चर्चा रंगली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.