Sindkhed Raja Saam Digital
महाराष्ट्र

Sindkhed Raja : राजवाडा, २२ तलाव, बारव...असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ; सिंदखेडराजाचं वैभव नामशेष होण्याच्या मार्गावर

Sindkhed Raja News : 19 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ आजही पूर्णतः दुर्लक्षित राहिले आहे.

Sandeep Gawade

Sindkhed Raja

देशात व राज्यात गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उद्या 19 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ आजही पूर्णतः दुर्लक्षित राहिले आहे.

राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यासह सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक 22 तलाव, बारव व ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व ऐतिहासिक वास्तू केंद्र व राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. त्या सर्व वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं जतन संवर्धन व्हावं यासाठी नागरिकांन अनेक आंदोलने केली आहे, मात्र अद्याप सरकारने लक्ष दिलेलं नाही. राज्य सरकार जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी विकास आराखडा घोषित करते, मात्र अद्याप कुठलाच विकास होत नसल्याने अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक पोलिसांकडून शहरात सिंघम स्टाईल रुटमार्च

उद्या १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवरायांचा जन्मदिन. राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी सिंघम स्टाईल रूट मार्च काढला. (Shivjayanti Utsav 2024)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवजयंतीच्या  पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांच्या (Nashik) वतीने शहरात पोलिसांचा सिंघम स्टाईल रूट मार्च काढण्यात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे त्याचबरोबर पोलिसांना मिरवणुकीचा आणि शिव पालखीचा मार्ग माहिती व्हावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता.

शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड लाठी काठी घेईन मोठ्या संख्येत उपस्थित होते.कायद्या व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मनात धडकी निर्माण व्हावी यासाठी पोलिसांचा सिंघम स्टाईल पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT