'एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अधिकारी आणि सरकारमधील मंत्र्यांची रीघ लागत असताना दुसरीकडे मात्र ओबीसींच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे,' असा गंभीर आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या (Beed) भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कीर्तनवाडी येथे, ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, ही मागणी घेऊन ओबीसी बांधवांचे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र या आमरण उपोषणाकडे प्रशासनातील अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुर्लक्ष आहे.
एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्याकडे अधिकारी आणि सरकारमधील मंत्र्यांची रीघ लागत असताना दुसरीकडे मात्र ओबीसींच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याचबरोबर "राज्यात ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये देखील बोगसपणा आढळून येत आहे, त्यामुळे याची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र नेमकं कोणत्या प्रवर्गात आहे? हे अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं," असं आव्हान सानप यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकीकडे म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला जाणार नाही, मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र दिले जातात. त्यामुळे हे सरकार केवळ दोन समाजात तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी बाळासाहेब सानप यांनी केला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.