Aditya Thackeray: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार; असा असेल ठाणे दौरा!

Aditya Thackeray Vs CM EKnath Shinde: कोल्हापूरच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली असतानाच आज (रविवार, १८ फेब्रुवारी) आदित्य ठाकरे ठाणे दौऱ्यावर येत आहेत.
Aditya Thackeray Vs Eknath Shinde
Aditya Thackeray Vs Eknath ShindeSaam TV

Aditya Thackeray Thane Visit:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे कोल्हापूरच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली असतानाच आज (रविवार, १८ फेब्रुवारी) आदित्य ठाकरे ठाणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला ते काय उत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

असा असेल आदित्य ठाकरेंचा ठाणे दौरा..

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज युवा नेते आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत. आज संध्याकाळी ६ नंतर ठाण्यातील शाखांना भेट देणार आहेत तसेच पदाधिकाऱ्यां बरोबर संवाद देखील करणार आहेत. ठाण्यातील आनंद नगरचेक नाका या ठिकाणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे ठाण्याचे खासदार राजन विचारे स्वागत करणार आहेत.

त्यानंतर घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील शाखा, त्यानंतर मनोरमा नगर येथील शाखा, पाचपाखाडी येथील शाखा या ठिकाणी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घर असणार्‍या लुईसवाडी येथील जिजामाता नगर शाखेला भेट घेऊन संवाद साधणार आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray Vs Eknath Shinde
Maratha Reservation : 'विशेष अधिवेशनात सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट केली नाहीतर...', मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

मुख्यमंत्री शिंदेवर डागणार तोफ...

दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur) येथे शिवसेनेचे दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली होती. त्यामुळे आज आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोटार सायकल रॅलीमधून शिवसैनिक सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

Aditya Thackeray Vs Eknath Shinde
St Service Closed : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद; ८० लाखाचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com