Maratha Reservation : 'विशेष अधिवेशनात सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट केली नाहीतर...', मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil : राज्य सरकारने 'सगेसोयरे' याबाबत ज्या अधिसूचना काढल्या आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने २० तारखेला याबाबत अंमलबजावणी केली पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation
cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservationSaam TV
Published On

Manoj Jarange Patil :

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. येत्या २० तारखेला हे अधिवेशन पार पडणार आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगे पाटील यांनी मात्र मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारने 'सगेसोयरे' याबाबत ज्या अधिसूचना काढल्या आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने २० तारखेला याबाबत अंमलबजावणी केली पाहिजे, यासाठी आपलं आंदोलन सुरु असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांना सापडलेल्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र मिळावे यासाठी सगेसोयरेबाबत अंमलबजावणी केली पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

सगेसोयरेंबाबत २० फेब्रुवारीला अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. जर सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट झाली नाहीतर लगेच आंदोलनाची घोषणा करणार आहोत. त्यानंतर २१ तारखेला नियोजनबद्ध आंदोलनची दिशा ठरवली जाणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com