शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे. आज या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस. आज महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.कोल्हापूर आणि बाळासाहेबांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळेच त्याच्या आशीर्वादाने आपण पून्हा शिवसेना नव्याने उभी करतोय. आपला पक्ष मोठा होतोय हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपला धनुष्यबाण नाव हे आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. बाळासाहेब यांचे विचार पुढे नेहतोय त्यामुळेच आपला विजय निश्चित आहे. आपल्या गर्दीमुळे शिवसेना कुणाची हे सांगायची आवश्यक्यता नाही," असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
कोल्हापूर महानगरपालिका शासन निधीतून विविध विकासकामे करत आहेत. दरम्यान दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी या कामांचं लोकार्पण केलं. महानगरपालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाकडून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी मिळालेल्या विविध निधीच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहेत.
कोल्हापूरचा पूर नियंत्रित करण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे त्यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी उपलब्ध झालेला आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर, अंबाबाई आणि जोतिबाचा विकास आराखडा करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
1) काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे उद्घाटन
2 ) शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचं उद्घाटन
3 ) सहाशे कोटी निधीच्या विकास कामांचं उद्घाटन
4) शहीद जवानांच्या कुटुंबीयांना जमीन आणि चेकचं वितरण
5) अनुभव कंपाखाली दोन वाहन चालकांना नियुक्ती पत्राचं वितरण
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डंपर पोकलँड आणि ट्रॅक्टरचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. पालकमंत्री हसन मुश्रीफ आल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.