mla vaibhav naik 
महाराष्ट्र

परब हल्ला प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यावर शिवसैनिकांचा माेर्चा

आमदार वैभव नाईक यांनी मुख्य सूत्रदाराला अटक करण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा या मागणीसाठी आज (साेमवार) शिवसेना आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. या ठिकाणी सेनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी संशयित आराेपींना अटक करा अशा घाेषणा दिल्या.

सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा बँक (dcc bank) निवडणुकीचे वातावरण आता जिल्ह्यात चांगलंच तापू लागले आहे. संतोष परब यांच्यावर कणकवलीत (kankavali) झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे मतदार बेपत्ता असलेल्या प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या अशी मागणीही करण्यात आली. यावेळी तापसी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन देण्यात आले.

कणकवलीत वरिष्ठ पाेलिस अधिकारी

दरम्यान राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत. सध्या जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले असतानाच संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंना (nitesh rane) अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT