Sindhudurg News Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : कारमधून १० लाखाची रोकड जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची कारवाई

Sindhudurg News : जिल्हा बाहेरून किंवा राज्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून प्रशासन आतापासून अलर्ट मोडवर आले आहे. काही ठिकाणी वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली असून भरारी पथकाने (Sindhudurg) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली फोंडाघाट येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीमध्ये १० लाखाची रोकड पकडली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन ॲक्शन मोडवर आलेली आहे. फोंडाघाट पोलीस (Police) चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम व चार चाकी जप्त केली आहे. जिल्ह्यात सद्या विविध ठिकाणी भरारी पथक तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा बाहेरून किंवा राज्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यातील पहिली कारवाई 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली? कोणी आणली? कुठे घेऊन जाण्यात येत होती? याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT