Sindhudurg News  Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg: ऐतिहासिक निर्णय! कोकणातील रस्ते, वाड्यांची जातीवाचक नावे बदलली; यापुढे काय नावाने ओळखणार? वाचा लिस्ट

Sindhudurg Road And Wadi Name Changed: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि वाड्यांची नावं बदलण्यात आली आहेत. वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

Priya More

Summary -

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्या आणि रस्त्यांची नावं बदलण्यात आली

  • १९२ वाड्या आणि २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यात आली

  • महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नावे देण्यात आली

  • जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामसभेच्या ठरावानुसार निर्णय घेतला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावे देण्यात आली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गावांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हरिजन वाडी, चर्मकार वाडी, बौद्ध वाडी अशी जातीवाचक नावे इतिहासजमा होऊन सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या वाड्या आणि रस्त्यांना नवीन नावं काय देण्यात आली आहेत याची यादी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील, शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं आहेत. ही जातीवाचक नावे बदलून महापुरूषांची आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावे देण्यासंदर्भात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय घेतला. या नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण १९२ जातीवाचक वस्त्यांची आणि २५ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरता ग्रामसभेचा ठराव पास करून त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले.

त्यानंतर जातीवाचक नावे बदलून नवीने नावे देण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावात प्रस्तावित करण्यात आलेली नवीन नावे देण्यात आली आहेत. यानुसार सिद्धार्थनगर, भिमाईनगर, आंबेडकरनगर, छत्रपती शाहूनगर, शिवभीमनगर, अहिल्यानगर, समतानगर, जाधववाडी, भीमक्रांती नगर अशाप्रकारची अनेक नावं देण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर सहायक उपनिरीक्षकांनी आयुष्य संपवलं; पोलीस दलात पुन्हा खळबळ, हरियाणात नेमकं काय घडतंय?

Bigg Boss 19: अशनूर चिडली गौरव खन्नावर, फरहानाने केला अमालचा अपमान; काय घडलं बिग बॉसच्या घरात

Shivani Rangole: बोलके डोळे अन् ओठांवर लाली, टिव्हीवरच्या मास्तरीणबाईंनी केलं घायाळ

Lung cancer symptoms: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये शरीरात होऊ लागतात 'हे' मोठे बदल; इतर अवयवांमध्येही पसरण्याचा धोका

SCROLL FOR NEXT