Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल काही दिवसांपूर्वीच बातम्या आल्या होत्या. आता त्यांच्या लग्नाबाबत नवीन अपडेट्स येत आहेत.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaSaam Tv
Published On

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्याही आली होती. दरम्यान, रश्मिकाचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये ती स्वतः म्हणते की ती विजयशी लग्न करेल. जाणून घ्या नक्की काय बोलली रश्मिका

रश्मिकाने काय म्हटले?

ऑनेस्ट टाउनहॉल कार्यक्रमात रश्मिकाला विचारण्यात आले होते की, "तू ज्या कलाकारांसोबत काम केले आहे त्यापैकी तुला कोणाला डेट करायला, लग्न करायला आणि मारायला आवडेल?" रश्मिकाने उत्तर दिले, "मला नारुटोला डेट करायला आवडेल. मला नारुटोचं लहानपणापासून वेड आहे आणि मी विजयशी लग्न करेन." रश्मिकाच्या उत्तराने उपस्थित चाहते आणि प्रेक्षकांना तिचं उत्तर ऐकून आनंद झाला.

Rashmika Mandanna
Home Remedy to Remove Pimples: चेहऱ्यावर पिंपल्स येणे कायमचे होतील बंद; फक्त १ आठवड्यात वापरुन पाहा 'हा' घरगुती उपाय

रश्मिकाचे हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि चाहते खूश आहेत की तिने अखेर कबूल केलं. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रश्मिका आणि विजय पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत आहेत. फेब्रुवारीमध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकू शकतात. याचसह रश्मिका अॅनिमे नारुटोची खूप मोठी चाहती आहे. नारुटो आणि अॅनिमेवरील तिच्या प्रेमाबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, "मी फक्त अॅनिमे पाहते. मी नारुतो पाहत लहानाची मोठी झाले आहे. सुमारे ६०० एपिसोड आहेत आणि मी ते सर्व पाहिले आहेत."

Rashmika Mandanna
Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

रश्मिकाच्या कामाबद्दल

रश्मिकाचा नुकताच तिचा "थामा" हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ती पुढे सैफ अली खान आणि क्रिती सॅनन यांच्यासोबत "कॉकटेल २" मध्ये दिसणार आहे. यासह रश्मिका लवकरच क्रिती आणि शाहिदसोबत 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com