Shruti Vilas Kadam
एक चमचा हळद पावडर, एक चमचा ॲलोवेरा जेल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्स असलेल्या भागावर १५-२० मिनिटं लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
हा घरगुती उपाय करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. धूळ, तेल आणि मेकअपमुळे त्वचेमध्ये जंतू वाढतात, त्यामुळे चेहऱ्यावरील अशुद्धता काढून टाकणे गरजेचे आहे.
हा फेस पॅक आठवड्यातून तीन वेळा वापरल्यास उत्तम परिणाम मिळतात. नियमितपणे वापरल्याने त्वचेचा ग्लो वाढतो आणि पिंपल्स कमी होतात.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात, ॲलोवेरा त्वचेला थंडावा देतो व सुज कमी करतो, तर लिंबाचा रस अतिरिक्त तेल काढून त्वचा उजळवतो.
जास्त तेलकट व तिखट पदार्थ टाळा. पाणी भरपूर प्या, फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करा. आहारातील बदलामुळे पिंपल्सवर नियंत्रण ठेवते.
जर हा घरगुती उपाय केल्यानंतर त्वचेला खाज, लालसरपणा किंवा जळजळ जाणवत असेल, तर त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पिंपल्सवर कोणताही उपाय त्वरित परिणाम दाखवत नाही. सातत्य आणि नियमित काळजी घेतल्यास काही दिवसांतच फरक जाणवू लागतो.