मराठमोळ्या अधिकाऱ्याचं 'पुढचं पाऊल'! IRTS अधिकारी सुशील गायकवाड महाराष्ट्र शासनाचे दिल्लीतील गुंतवणूक आयुक्त, पदभार स्वीकारला

Sushil Gaikwad maharashtra sadan resident commissioner : मूळचे सोलापूरचे रहिवासी असलेल्या सुशील गायकवाड यांची नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सरकारचे दिल्लीमधील गुंतवणूक आयुक्त या पदावर नियुक्ती झाली असून, त्यांनी या पदाचा कार्यभार आज स्वीकारला.
IRTS Officer Sushil Gaikwad assumes charge as Resident Commissioner (Investment) at Maharashtra Sadan, Delhi
IRTS Officer Sushil Gaikwad assumes charge as Resident Commissioner (Investment) at Maharashtra Sadan, Delhisaam tv
Published On

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सरकारचे गुंतवणूक आयुक्त या पदाचा कार्यभार भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी सुशील गायकवाड यांनी आज, गुरुवारी मुंबई येथे स्वीकारला. महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी गायकवाड यांची या पदावर प्रतिनियुक्ती केली आहे. गायकवाड यांचे दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात कार्यालय असेल.

सोलापूर जिल्ह्याचे मूळ निवासी असलेले गायकवाड हे 1998 बॅचचे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (IRTS) अधिकारी आहेत. यापूर्वी ते केंद्र सरकारच्या संरक्षण राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी रेल्वे, सरंक्षण, वस्त्रोद्योग, पर्यटन आणि आयुष या मंत्रालयात काम केलेले आहे. विविध सरकारी सार्वजनिक उपक्रमावर, स्वायत्त संस्था, निर्यात प्रोत्साहन परिषद, यावर कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

रेल्वेत उल्लेखनीय कामगिरी, चार वेळा पुरस्कारानं सन्मानित

रेल्वे विभागात त्यांनी बेंगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथे विविध उच्चपदांवर आपली सेवा बजावली आहे. रेल्वेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांची निवड संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी परिषद'च्या (FAO) हार्ड फायबर आंतरराष्ट्रीय गटावर उपाध्यक्ष म्हणून झाली होती. या भूमिकेतून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे.

सरंक्षण मंत्रालयात, कार्यकारी संचालक या पदावर काम करताना ऑपरेशन सिंदूरमध्ये दिलेल्या योगदानाबाबत भारतीय लष्करप्रमुखांचे कमेंडेशन पदक नुकतेच जाहीर झाले होते. तसेच यापूर्वी देखील त्यांना चीफ ऑफ डिफेन्स (सीडीएस) यांचे कमेंडेशन पदकाने गौरवण्यात आले होते.

मराठी साहित्यावर विशेष प्रेम

प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच गायकवाड यांना मराठी साहित्याचे विपुल वाचन आणि विशेष प्रेम आहे. त्यांनी "झेंगट" या कादंबरीचे लेखन केले आहे, या व्यतिरिक्त त्यांचे काही लेख नियतकालिकांतूनही प्रकाशित झाले आहेत. प्रवास, ट्रेकिंग आणि छायाचित्र हे त्यांचे विशेष छंद आहेत.

दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांची "पुढचं पाऊल" या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि गेल्या काही काळापासून या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला, संस्कृती तसेच राज्याच्या विविध विषयासंदर्भात दिल्लीमध्ये नियमित कार्यक्रम आयोजित करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com