Manasvi Choudhary
रविवारी नाश्त्याला इडली, मेदूवडासोबत सांबर- चटणी खाण्याची मज्जा वेगळीच असते.
साऊथ इंडियन स्टाईल सांबर तुम्ही घरी देखील बनवू शकता. सांबर घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
१) साबंर बनवण्यासाठी तूरडाळ, टोमॅटो, कांदा, शेवग्यांच्या शेंगा, भेंडी, कढीपत्ता, चिंच हे साहित्य घ्या.
२) हिंग, मोहरी, मसाला, सुक्या लाल मिरच्या, हळद, मीठ, तेल घ्या.
सर्वप्रथम तूरडाळ २ तास भिजत ठेवा. पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवावी.
टोमॅटो, कांदा आणि शेवग्यांच्या शेंगा कापून घ्या.
गॅसवर कुकरमध्ये तूरडाळ, कापलेल्या भाज्या आणि भिजवलेली चिंच मिक्स करा. या मिश्रणात मीठ आणि हळद देखील घाला.
आता एका पॅनमध्ये उकडलेली डाळ चांगली शिजवून घ्या नंतर त्यात गूळ, सांबर मसाला घालून मिसळून घ्या.
मसाला तयार करण्यासाठी एका भांड्यात मोहरी, संपूर्ण लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घाला.
सांबर मिश्रणाला फोडणी द्या आणि नंतर संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी गरमागरम सांबर तयार आहे.