नगरमधील पावसाने सीना नदीही दुथडी. 
महाराष्ट्र

दुष्काळी पट्ट्यातील "सीना"ही "ओव्हर फ्लो"

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : मागील अनेक महिन्यांपासून मिरजगाव व परिसरातील अनेक गावे प्रतीक्षा करीत असलेले सीना धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. जास्तीच्या पाण्याचा विसर्गदेखील करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील गावांसह आष्टी तालुक्यासाठीदेखील हे धरण वरदान आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. धरणातून सीना नदीपात्रात काल 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सद्य स्थितीला सीना दुथडी भरून वाहत असल्याने सीना पट्ट्यातील ऊसबागायतदार व पशुपालकांत आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु यावर्षी धरण परिसरात लांबणीवर पडलेल्या पावसामुळे धरण भरू शकले नव्हते. परंतु मागील काही दिवसांपासून सीना धरण आवक क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. Sina dam overflow in Karjat taluka abn79

पुढील दोन दिवसांत धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज वर्तवला गेला असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रशानाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सीना धरण पाणी क्षमता व सिंचन क्षेत्र

पाणी पातळी : 584.01 (मिटर)

धरण क्षमता/एकूण साठा : 2400.00 (द.ल.घ.फू.)

उपयुक्त साठा :1847.33 (द.ल.घ.फु.)

एकूण साठा टक्केवारी :100 %

आजची आवक: 88.61 (द.ल.घ.फु.)

एकूण आवक:1644.32 (द.ल.घ.फु.)

उजवा कालवा विसर्ग : 100 क्यूसेस

सांडवा विसर्ग: 56.00 क्यूसेस

सिंचन क्षेत्र - 8445 हेक्टर

( उजवा कालवा - 7672 हेक्टर व डावा कालवा - 773 हेक्टर)

उपसा सिंचन - 1200 हेक्टर.

लाभक्षेत्रातील तालुके- कर्जत, श्रीगोंदा व आष्टी तालुका.Sina dam overflow in Karjat taluka abn79

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

SCROLL FOR NEXT